@ उद्घाटन सोहळा @
📌 *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा जामनेर ता. जामनेर जि. जळगाव या शाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन*
📌 *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा जामनेर ता. जामनेर जि. जळगाव या शाळेतील डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन व तेथील विद्यार्थीनींशी मुख्यमंत्र्यांचा मुक्त संवाद*
📌 *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते श्री. संदिप मधुकर सोनार , विषयशिक्षक , जि.प.मराठी शाळा मोयखेडे दिगर ता. जामनेर यांच्या 'तंत्रस्नेही शिक्षक' या शैक्षणिक ब्लॉगचे उद्घाटन*
आज दिनांक १६ अॉक्टोबर २०१६ रोजी दु. १ वा. ४५ मि. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा जामनेर ता. जामनेर जि. जळगाव या शाळेच्या नुतन इमारतीचे , तेथील डिजिटल क्लासरुमचे तसेच संदिप सोनार यांच्या शैक्षणिक ब्लॉगचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री साहेबांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.
या वेळी मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन ( जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री , महाराष्ट्र राज्य ) तसेच इतर मान्यवर मंत्री , पदाधिकारी , मा.श्री. अस्तिककुमार पाण्डेय ( मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. जळगाव ) , मा.श्री. बी. जे. पाटील ( शिक्षणाधिकारी , प्राथमिक , जि. प. जळगाव ), मा.डॉ.श्री. डी. एम. देवांग ( उपशिक्षणाधिकारी , प्राथ. जि. प. जळगाव ), मा.श्री. ए. बी. गायकवाड ( उपशिक्षणाधिकारी , प्राथ. जि. प. जळगाव ) उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी मा.श्री. श्रीकृष्ण इंगळे ( गटविकास अधिकारी ), मा.श्री. ए. बी. वाडकर ( गटशिक्षणाधिकारी ), मा.श्री. आर. पी. दुसाने (शिक्षणविस्तार अधिकारी ), मा.श्री. आर. एस. सपकाळे ( शिक्षणविस्तार अधिकारी ), मा.श्री. व्ही. सी. धनके ( शिक्षणविस्तार अधिकारी ), मा.श्री. व्ही. व्ही. काळे ( शिक्षणविस्तार अधिकारी ) ,पंचायत समिती जामनेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले.
सदर कार्यक्रमासाठी श्री. संजय भा. पाटील ,(केंद्रप्रमुख, जामनेर), श्री. रामचंद्र वानखेडे ( केंद्रप्रमुख, वाकडी), श्री. सुरेश साळी (केंद्रप्रमुख , फत्तेपूर ), श्री. डी. डी. घ्यार ( केंद्रप्रमुख, टाकळी) तसेच केंद्रप्रमुख श्री. इधाटे, श्री. ठाकुर , श्री. बडगुजर , श्री. आगळे , श्री. धुंदाळे श्रीम. अलका वानखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.मराठी केंद्र शाळा जामनेर येथील मुख्याध्यापक , श्री. राजेंद्र केदारे , विषयशिक्षक श्री. समाधान बाविस्कर , सर्व शिक्षकवृंद , श्री. संदिप सोनार सर , श्री. राजेंद्र सावळे सर, श्री. गिरणारे सर , श्री. भिमराव जोहरे सर तसेच शाळेतील विद्यार्थी व अनेकांनी परिश्रम घेतले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
0 Comments: