Headlines
Loading...
डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती

डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती

* डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा ..

                    ( जळगाव जिल्हा )


    प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत  डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा २१/०६/२०१७   रोजी छत्रपती  शाहू सभागृह जळगाव  येथे घेण्यात आली.
या कार्यशाळेत ......
मा. श्री. कौस्तुभ दिवेगावकर ( भा प्र से)
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांनी याबाबत सखोल व प्र्र्रेरणादायी मार्गदर्शन  केले.
सोबत श्री. बी. जे. पाटील साहेब 
शिक्षणाधिकारी ,  प्राथमिक जि. प. जळगाव
श्री. डॉ. डी. डी. देवांग  उपशिक्षणाधिकारी , जि. प. जळगाव तसेच 
खलील शेख साहेब व पठाण साहेब उपस्थित होते.

 🖥 * डिजीटल अभ्यासक्रम निर्मिती * 📱


📌 उद्देश ....


इ. १ ली ते ८ वी सर्व विषयांचा प्रत्येक  घटकानुसार/पाठानुसार अभ्यासक्रम (डिजीटल / इ लर्निंग स्वरुपात ) संकलित करणे तसेच स्वतः तयार करुन तो जिल्ह्यातील सर्व शाळांना मोफत वितरीत करणे.*
    या बाबत नियोजन करण्यात आले आहे . त्यासाठी विषय निहाय जिल्हा विषय शिक्षक समिती  स्थापन करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षक व विषय समिती सदस्यांच्या सहकार्याने व्हिडीओ , अॉडिओ , pdf , ppt स्वरुपात अभ्यासक्रम तयार / संकलित केला जाणार आहे.
तसेच शिक्षक व विद्यार्थी गुणवत्ता विकसनासाठी उपयुक्त  pdf पुस्तके व ग्रथांलयासाठी पुस्तके देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.  याबाबत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सखोल मार्गदर्शन केले आहे.


                      ✍🏻 संदिप मधुकर सोनार                     

                                 तंत्रस्नेही शिक्षक                

                       जिल्हा विज्ञान समिती सदस्य






डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती बाबत मार्गदर्शन करतांना मा. कौस्तुभ दिवेगावकर , मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव सोबत मा. बी. जे पाटील साहेब , शिक्षणाधिकारी , मा. डॉ. डी. डी. देवांग साहेब , उपशिक्षणाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी 





0 Comments: