Headlines
Loading...
डिजिटल अभ्यासक्रम वितरण सोहळा

डिजिटल अभ्यासक्रम वितरण सोहळा


💢 डिजिटल अभ्यासक्रम वितरण सोहळा  💢

             जिल्हा परिषद जळगाव 

💢   दिनांक : १४  ऑगस्ट २०१७ रोजी  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला , छ. शाहू महाराज हॉल , जि. प. जळगाव येथे डिजिटल अभ्यासक्रम वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
   💢 या कार्यक्रमासाठी मा. ना. चंद्रकांत पाटील  (महसूलमंत्री ,महाराष्ट्र राज्य  , पालकमंत्री  जळगाव ) , मा. खासदार  श्रीमती. रक्षाताई खडसे , मा. खासदार  श्री. ए. टी. नाना पाटील , मा. आमदार  उन्मेषदादा पाटील, मा. आमदार  श्री. हरिभाऊ जावळे , मा. आमदार  संजयजी सावकारे , मा. आमदार श्री. राजूमामा भोळे , मा. आमदार स्मिताताई वाघ , मा. ना. उज्वलाताई  मच्छिंद्र  पाटील  ( अध्यक्ष , जि. प. जळगाव , मा. श्री. नंदकिशोर महाजन  ( उपाध्यक्ष , जि. प. जळगाव ) , मा. श्री. पोपटतात्या  भोळे ( शिक्षण व क्रीडा सभापती  , जि. प. जळगाव ) , जि. प. जळगाव सर्व समित्यांचे सभापती . सर्व जि. प. सदस्य , मा. श्री . कौस्तुभ  दिवेगावकर ( मुख्यकार्यकारी अधिकारी , जि. प. जळगाव ) , मा. श्री. बी. जे. पाटील ( शिक्षणाधिकारी - प्राथ. , जि. प. जळगाव ) मा. श्री. डॉ. डी. एन. देवांग ( उपशिक्षणाधिकारी - प्राथ. ), जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी , तंत्रस्नेही शिक्षक , पत्रकार इ. उपस्थित होते.
💢 मा. ना. चंद्रकांत पाटील  (महसूलमंत्री ,महाराष्ट्र राज्य  , पालकमंत्री  जळगाव ) यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. ना. सौ. उज्वलाताई पाटील , अध्यक्ष जि. प. जळगाव यांनी भूषविले.
💢  पुष्पगुच्छ व पुस्तक देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
💢  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री .कौस्तुभ  दिवेगावकर , मुख्यकार्यकारी अधिकारी , जि. प. जळगाव  यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी डिजिटल अभ्याक्रमाविषयी माहिती दिली. सदर अभ्यासक्रम इ. १ ली ते ८ वी सर्व विषय व सर्व पाठ्य घटकांवर तयार करण्यात आलेला असून तो जिल्ह्यातील सर्व शाळांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. सदर अभ्यासक्रम कोणताही खर्च न करता शिक्षण विभाग प्राथमिक , जि. प. जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विषय शिक्षक (विषय समिती सदस्य ) व तंत्रस्नेही शिक्षक यांनी कोणतेही मानधन न घेता सेवाभाव वृत्तीने हा डिजिटल अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
💢  अशा प्रकारे डिजिटल अभ्यासक्रम तयार करणारी जि. प. जळगाव  ही महाराष्ट्रातील पहिली जि. प. आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदर डिजिटल अभ्यासक्रम पूरक ठरणार असल्याचे मत मा. CEO साहेब यांनी व्यक्त केले.
💢  डिजिटल अभ्यासक्रमाचे प्रकाशन व लोकार्पण मा. ना. चंद्रकांत पाटील  (महसूलमंत्री ,महाराष्ट्र राज्य  , पालकमंत्री  जळगाव ) यांनी  मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
💢 डिजिटल अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक व निर्मितीचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. इ. ७ वी मराठी , श्रावणमास ही बालकवींची कविता ( video निर्मिती - संदीप सोनार , जामनेर -जळगाव ) व इतर विषयांचे इ - साहित्याचे  सादरीकरण करण्यात आले.
💢  तसेच या वेळी चाळीसगाव तालुक्यातील ५ शाळांना रोटरी मिल्क क्लब चाळीसगाव यांचे मार्फत इ - लर्निंग संचाचे वितरण करण्यात आले. व मा. आमदार संजय सावकारे यांचे कडून भुसावळ तालुक्यातील ३ शाळांना Tab चे वितरण करण्यात आले. तसेच भुसावळ तालुका १०० टक्के डिजिटल शाळा म्हणून घोषित करण्यात आला.
💢 तसेच गाडगेबाबा ग्राम स्वच्छता  अभियान अंतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले.
💢 मा. श्री. पोपटतात्या  भोळे ( शिक्षण व क्रीडा सभापती  , जि. प. जळगाव ) यांनी आपल्या मनोगतातून जिल्ह्यातील जि. प. शाळांच्या स्थितीचा लेखाजोखा मांडला. तसेच जि. प. शाळा १०० टक्के डिजिटल होण्यासाठी व शाळांना भौतिक सुविधा , कुंपण मिळण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली.
💢 मा. खासदार , रक्षाताई खडसे  यांनी  'आपण शिक्षण सभापती असतांना पाहिलेले गुणवत्तापूर्ण डिजिटल शाळांचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याने माझ्या साठी आज भाग्याचा दिवस असल्याचे ' यावेळी म्हटले.
💢  मा. ना. चंद्रकांत पाटील  (महसूलमंत्री ,महाराष्ट्र राज्य  , पालकमंत्री  जळगाव ) यांनी डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती केल्याबद्दल मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब , जि. प. जळगाव सर्व पदाधिकारी व अधिकारी , विषय शिक्षक व तंत्रस्नेही शिक्षक यांचे कौतुक केले. तसेच जिल्यातील सर्व जि. प. शाळांचे नुतनीकरण ( गळती , दुरुस्ती ,रंगरंगोटी इ. ) १ वर्षाच्या कालावधीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले.
💢 सौ. पौर्णिमा फेगडे  यांनी यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
💢 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजबसिंग पाटील यांनी व आभार प्रदर्शन मा.श्री. देवांग साहेब यांनी केले.
💢 सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि. प. जळगाव पदाधिकारी , अधिकारी , तंत्रस्नेही शिक्षक यांनी सहकार्य केले.

             💢 शब्दांकन ....
          श्री. संदीप मधुकर सोनार 
       तंत्रस्नेही शिक्षक , जामनेर ( जळगाव )
   जळगाव जिल्हा  विज्ञान विषय समिती सद

0 Comments: