Headlines
Loading...
राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती

राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती

@ राजमाता जिजाबाई जयंती ......

    १२ जानेवारी २०१७
            #  विनम्र अभिवादन !!!  #


पूर्ण नाव  - जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म - जानेवारी १२ इ.स. १५९८
सिंदखेडराजा,बुलढाणा.
मृत्यू - जून १७, इ.स. १६७४
पाचाड, रायगडचा पायथा
वडील - लखुजीराव जाधव
आई - म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती  - शहाजीराजे भोसले
संतती - छत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले- (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)
राजघराणे - भोसले
चलन - होन
जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
  राजमाता जिजाबाई यांच्या विषयी अधिक माहिती साठी ... येथे क्लिक करा.

@ स्वामी विवेकानंद जयंती ( राष्ट्रीय युवा दिवस )


     # विनम्र अभिवादन !!! #



पूर्ण नाव - विवेकानंद
नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त(संन्यासाश्रमापूर्वी)
जन्म - जानेवारी १२, १८६३
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू - शुक्रवार जुलै ४, १९०२
बेलूर, कोलकाता, भारत
कार्यक्षेत्र - धर्म
राष्ट्रीयत्व - भारतीय
भाषा - बंगाली, इंग्रजी
प्रमुख विषय - वेदान्त, योग
प्रभाव - रामकृष्ण परमहंस
वडील - विश्वनाथ दत्त
आई - भुवनेश्वरी नंदलालजी बसु


स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.
      स्वामी विवेकानंद यांच्या विषयी अधिक माहितीसाठी ... येथे क्लिक करा.

@ युवकांचे स्वामी विवेकानंद,  युवादिन @

१२ जानेवारी हा विश्वविख्यात स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. १९८४ साली भारत सरकारने १२ जानेवारी हा `राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून जाहीर केला आणि त्या वर्षीपासूनच देशभर `राष्ट्रीय युवा दिवस' साजरा करण्यात येतो. `स्वामी विवेकानंदांचे विचार आणि ज्या ध्येयासाठी ते जगले आणि त्यांनी कार्य केले, ते भारतीय युवकांना महान प्रेरणादायी ठरतील असे वाटल्याने भारत सरकार १२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित करीत आहे,' असे भारत सरकारने याबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले होते.
       राष्ट्रीय युवा दिवस .. अधिक माहिती साठी .. येथे क्लिक करा.



     

0 Comments: