Headlines
Loading...
डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा

डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा

डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा - जिल्हा जळगाव


  💥 दि. ५/०८/२०१७ रोजी , जि.प.जळगाव येथे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभजी दिवेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  शाहू महाराज सभागृहात डिजीटल अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडली.

 💥  कार्यशाळेचा थोडक्यात वृत्तांत 💥

📌 सर्व प्रथम डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती बाबत आढावा घेण्यात आला. १५ अॉगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर अभ्यासक्रम सर्व शाळांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
📌 प्रत्येक विषयांच्या कार्यशाळा जिल्हा विषय समिती सदस्य व त्या विषयांतील तज्ञांच्या सहकार्याने प्रत्येक तालूक्यात शिक्षकांसाठी घेण्याबाबतचे नियोजन मा. कौस्तुभ दिवेगावकर साहेब यांनी कार्यशाळेत मांडले व त्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
📌 इतिहासाचे अभ्यासक आदरणीय श्री.भुजंग बोबडे यांनी इतिहास विषयक आपले विचार प्रकट केले व या विषयाच्या कार्यशाळेत घ्यावयाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.
📌 संविधान व त्यातील मार्गदर्शक तत्वांची ओळख व्हावी या दृष्टीने शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे त्या बाबतचे नियोजन श्री. बिर्हाडे साहेब यांनी मांडले.
📌 अनेक तज्ञ शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. विनंतीवजा सुचना मांडल्या. श्री.किशोर पाटील-कुंझरकर सर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी नवनवीन व प्रेरक उपक्रम सुचवले. यामध्ये संविधान जागृती, लेखक व कवींनी स्वत:च्या पाठ व कवितांचे अध्यापन करुन या आदर्शपाठांचे व्हिडीओ प्रत्येक वर्गात दाखवणे इ. या उपक्रमांना मा.CEO साहेब यांनी तात्काळ संमती दिली. व  हे उपक्रम राबवण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. तसेच शिक्षकांसाठी साहित्य संमेलन घेण्याबाबत साहेबांनी विचार मांडले.
📌 मराठी विषयासाठी कवी /लेखक  श्री. अशोक कोळी यांनी आपले विचार प्रकट केले व कार्यशाळेबाबत नियोजन मांडले.
📌 मा. शिक्षण सभापती श्री. पोपट तात्या भोळे यांनी डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती व शिक्षक समृद्धीकरणासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमांबाबत सर्वांचे कौतुक केले व याबाबत प्रेरक विचार प्रकट केले.
📌 हिंदी , इंग्रजी , गणित , विज्ञान , भूगोल या विषयांसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेबाबत व त्या घ्यावयाच्या उपक्रमांबाबत विषय समिती सदस्यांनी माहिती दिली व त्याबाबत  मा. मुख्यकार्यकारी साहेबांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
 📌 शिक्षणाधिकारी मा. श्री.बी.जे.पाटील साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. श्री.देवांग साहेब व श्री.गायकवाड साहेब, विस्तार अधिकारी मा. खलील शेख साहेब यांनी डिजिटल अभ्यासक्रम शाळांना उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा केली व त्याबाबतचे नियोजन व कार्यशाळेचा आढावा सर्वांसमोर मांडला व त्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
📌 तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने डिजिटल अभ्यासक्रम इयत्ता व विषयवार डि. व्हि. डी. स्वरुपात सर्व शाळांना उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करण्यात आले.

 💥 कार्यशाळेतील ठळक बाबी 💥

   ( १ ) या कार्यशाळेत मा. मुख्यकार्यकारी साहेबांनी अधिकारी व शिक्षक यांमधील दरी दूर करुन सु संवाद घडवून आणला. 'मी ceo , मी शिक्षणाधिकारी , मी. शिक्षणविस्तार अधिकारी हे सर्व विसरुन आपण एक शिक्षक म्हणून कार्य करा.' हे त्यांचे वाक्य खूप प्रेरक ठरले. 
 ( २ ) या कार्यशाळेत सर्वांना आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळाली.
 ( ३ ) शिक्षकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या कार्याचा गौरव/ कौतूक करुन मा. मुख्यकार्यकारी साहेबांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना बहूमान दिलेला आहे. त्यांचे हे विचार निश्चितच आम्हां सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी व पथदर्शक ठरतील.

       💢 शब्दांकन .....
        श्री.संदिप मधुकर सोनार
   जि. प. शाळा मोयखेडे दिगर
      ता. जामनेर जि. जळगाव
( जिल्हा विषय - विज्ञान समिती सदस्य )
www.moykhede.blogspot.in














0 Comments: